राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आफ्रिका दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात मलावी देशात पोहचल्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नुकत्याच आफ्रिका दौऱ्याच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात मलावी या देशात पोहचल्या आहेत. भारताच्या राष्ट्रपतींनी मलावी ला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. राष्ट्रपती आज एका वाणिज्यविषयक कार्यक्रमात आणि त्यानंतर भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. मलावी प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती लाझारस चकवेरा यांच्याबरोबर राष्ट्रपती मुर्मू उद्या द्विपक्षीय बैठका घेतील, तसंच शिष्टमंडळ पातळीवरच्या बैठकांमध्येही सहभागी होतील. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू मलावी मधल्या राष्ट्रीय युद्धस्मारक, श्री राधाकृष्ण मंदिर आणि मलावी सरोवर यासारख्या काही प्रेक्षणीय स्थळांनाही भेट देतील. भारत मलावी मधील मैत्रीच्या संबंधांना अधिक मजबूत करणं, हे या भेटीचं उद्दिष्ट आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.