शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी देशातल्या कृषिशास्त्रज्ञांनी नवीन योजना विकसित कराव्या – राष्ट्रपती

नैसर्गिक आपत्ती, हवामान बदल तसंच नैसर्गिक स्रोतांचा गैरवापर या समस्यांपासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी देशातल्या कृषिशास्त्रज्ञांनी नवीन योजना विकसित कराव्या, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज भुवनेश्वर इथे ओडिशा विद्यापीठाच्या ४० व्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. सुपीक जमीन, कुशल मनुष्यबळ, शेतीयोग्य हवामान आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर भारताने गेल्या काही वर्षांत कृषिक्षेत्रात मोठी प्रगती केली असून २०४७ शाळांपर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कृषिशास्त्रज्ञांचं योगदान खूप महत्वाचं ठरणार आहे असं त्या म्हणाल्या.