राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अँगोलाचा दौरा यशस्वीपणे पूर्ण केला असून त्या आता बोत्स्वानाच्या दौर्यासाठी रवाना होत आहेत. हा भारताच्या राष्ट्रप्रमुखांचा अँगोलाला झालेला पहिलाच दौरा आहे.सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सहकार्यासाठी आणि राजकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना रोजगाराची परवानगी देण्यासाठी दोन सामंजस्य करार यावेळी करण्यात आले.
राष्ट्रपती मुर्मू आज रात्री बोत्स्वानात पोहोचतील आणि तेथील राष्ट्रपती डुमा बोकॉ यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. बोत्स्वानाने भारतासोबत चित्ता स्थानांतर प्रकल्पात सहकार्याची तयारी दर्शवली आहे.