दक्षिण कोरियाच्या संसदेत हंगामी राष्ट्राध्यक्ष हान दक-सू यांच्या विरोधातला महाभियोगाचा प्रस्ताव १९२-० मतांनी मंजूर झाला. हान यांना पदावरून हटवण्यात आलं असून उपप्रधानमंत्री चोई संग मोक हे हंगामी राष्ट्राध्यक्ष आणि हंगामी प्रधानमंत्री म्हणून काम पहाणार आहेत.
दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर दोन आठवड्यांपूर्वी हान दक-सू यांनी पदभार स्वीकारला होता.