डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आफ्रिकन राष्ट्रातील दौरा आटपून मायदेशी परतल्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अल्जिरिया, मॉरिटॅनिया आणि मालावी या देशांचा दौरा पूर्ण करून काल नवी दिल्लीत परतल्या आहेत. या तीनही देशांशी संबंधांचा नवा ऐतिहासिक अध्याय त्यांच्या दौऱ्यामुळे जोडला गेला आहे. भारताकडे जी-वीस परिषदेचं अध्यक्षपद असताना आफ्रिका संघ या संघटनेचा कायमस्वरूपी सदस्या बनल्यानंतरचा मुर्मू यांचा हा पहिलाच दौरा होता. या आठवडाभराच्या दौऱ्यात राष्ट्रपतींनी तीनही देशांच्या प्रमुखांबरोबर द्विपक्षीय बैठका घेतल्या आणि तिथल्या भारतीय नागरिकांशी संवाद साधला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.