राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वजाचं आणि बोधचिन्हाचं अनावरण करणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वजाचं आणि बोधचिन्हाचं अनावरण करणार आहेत. तसंच जिल्हा न्यायपालिकेच्या समारोप सत्राला देखील त्या संबोधित करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय परिषदेत जिल्हा न्यायव्यवस्था, पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक न्यायालय कक्ष, न्यायिक सुरक्षा, प्रकरण व्यवस्थापन आणि प्रशिक्षण या पाच सत्रांचा समावेश होता. या परिषदेचं उद्घाटन काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. महिलांवरचे अत्याचार आणि मुलांची सुरक्षा ही समाजासाठी चिंतेची बाब असल्याचं ते यावेळी म्हणाले.