राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं विविध मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करणार आहेत. या वर्षी सरकारनं १३९ पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून त्यामध्ये ७ पद्म विभूषण, १९ पद्म भूषण आणि ११३ पद्मश्रींचा समावेश आहे. पहिल्या समारंभात राष्ट्रपतींनी ७१ पद्म सन्मान प्रदान केले. आजच्या कार्यक्रमात ६८ मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करण्यात येतील.