राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू मॉरिटानिया इथं पोहचल्या

राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू तीन देशांच्या दौऱ्यावर असून आज त्या मॉरिटानिया मध्ये दाखल झाल्या आहेत. मॉरिटानियाचे राष्ट्रपती मोहम्मद औलद गजौनी यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. मॉरिटानिया दौऱ्यात राष्ट्रपती तिथल्या भारतीय वंशाच्या नागरिकांची भेट घेणार आहे. तसंच द्विपक्षीय बैठका देखील घेणार आहेत.