राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल राष्ट्रपती भवन इथं आयोजित करण्यात आलेल्या समारंभात पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर आणि गझल गायक पंकज उधास यांना ‘पद्मभूषण सन्मान’ प्रदान करण्यात आला.
पंकज उधास यांच्या पत्नीने हा सन्मान स्विकारला. मारोती चीतमपल्ली यांना वन्यजीव अभ्यासक,साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील तर चैत्राम पवार यांना पर्यावरण ,वनसंवर्धन, आणि सामाजिक क्षेत्रातील कामासाठी पद्मश्री सन्मान देण्यात आला.
अरुंधती भट्टाचार्य, पवनकुमार गोयंका व्यापार आणि उद्योग क्षेत्र, तर जस्पिंदर नरुला, रोणू मजुमदार, वासुदेव कामत यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री सन्मानानं गौरविण्यात आलं.