डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

श्रीकृष्ण जयंतीच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना तसंच परदेशस्थ भारतीयांना श्रीकृष्ण जयंती अर्थात कृष्णाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान श्रीकृष्णांच्या दैवी आदर्शांची आठवण करुन देणारा हा सण सर्वांना कायम प्रेरणा देत राहील असं मुर्मू यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती  जगदीप धनखड यांनी कृष्णाष्टमीच्या शुभेच्छा देताना म्हटलं आहे की हा दिवस आपल्याला चांगल्याचा वाईटावर विजय आणि इतर उच्च जीवनमूल्यांचं स्मरण करुन देतो.