डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आफ्रिकन राष्ट्रातील दौरा आटपून मायदेशी रवाना

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आफ्रिकन राष्ट्रातील आपल्या तीन दिवसांचा दौऱा आटपून भारतात परतत आहेत. मलावी विमानतळावर आज त्यांना उपराष्ट्रपती मिशेल बिझवीक यांनी निरोप दिला. यावेळी अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. दिल्लीसाठी रवाना होण्यापूर्वी त्यांनी मलावीतल्या सांस्कृतिक स्थळांना भेटी दिल्या. अलगेरिया, मोरिटानिया आणि मालावी या तीन देशांच्या दौऱ्यात राष्ट्रपतींनी मालावीचे अध्यक्ष लाजरस चकवेरा यांच्याशी द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केली. या तीन्ही देशातल्या  भारतीय वंशाच्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. भारत आणि मलावीदरम्यान क्रीडा, युवा, औषधनिर्माण, कला आणि संस्कृती क्षेत्रात सहकार्यासाठी चार सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.