डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मनोरुग्ण रुग्णांबाबत गैरसमज असल्यानं त्यांची काळजी घेणं आव्हान असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

मनोरुग्ण आणि मेंदूशी संबंधित विकाराने ग्रस्त रुग्णांबाबत अनेक गैरसमजुती असल्यानं त्यांची काळजी घेणं समाजापुढे आव्हान बनलं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. 

बंगळुरूच्या निमहान्स या राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य आणि मेंदूविज्ञान संस्थेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात आज त्या बोलत होत्या. निमहान्सने सुरु केलेली टेलिमानस सेवा मानसोपचारांमधे उपयुक्त ठरत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं. निमहान्सच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त विविध सेवा सुविधांचं लोकार्पण या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते झालं.