देश सर्वप्रथम या तत्त्वानुसार राष्ट्रनिर्माण हे सर्व संस्थांचं ध्येय असलं पाहिजे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. आंध्र प्रदेशातल्या पुट्टपार्थी इथं श्री सत्य साईबाबा यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यात्मिक संस्थांनी राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान द्यावं, असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं.
व्यक्तिगत पातळीवर आणि समाज म्हणून वैश्विक शांतीला बळ मिळावं, आणि संपूर्ण मानवतेचं कल्याण व्हावं, यासाठी प्रयत्न करावेत असंही राष्ट्रपती म्हणाल्या. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि इतर यावेळी उपस्थित होते.