विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी समाजाच्या सर्व घटकांना विशेष करून वंचित आणि मागास समुदायाला समान संधी मिळणं आवश्यक आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं. केरळमधल्या राजभवनात माजी राष्ट्रपती के आर नारायणन् यांच्या पुतळ्याचं राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या.
के. आर. नारायणन् यांनी प्रामाणिकपणा, करुणा आणि उच्च लोकशाही मूल्यांचा वारसा ठेवला असल्याचं त्यांनी सांगितलं. नारायणन् यांनी राष्ट्र निर्माण आणि सर्वसमावेशक देशाच्या निर्मितीसाठी आपलं आयुष्य समर्पित केलं, असंही त्या म्हणाल्या. शिक्षण हाच समाजाच्या विकासाचा आधार आहे, यावर नारायणन् यांचा दृढ विश्वास होता असा उल्लेख त्यांनी केला.