डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

कार्यप्रणालीत बदल करुन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन

सहकारी संस्थांनी कार्यप्रणालीत बदल करावे, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. कोल्हापूरच्या वारणानगर इथं श्री वारणा महिला सहकारी गटाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. श्री वारणा महिला सहकारी विविध उद्योग समूहाचा सुवर्ण महोत्सवी सोहळा आणि वारणा विद्यापीठाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. सहकार क्षेत्राच्या संपूर्ण क्षमतेचा वापर अद्याप झालेला नाही. या संस्थांनी व्यवस्थापनात अचूकता आणावी, यासाठी अधिकाधिक युवांना या क्षेत्राशी जोडून घ्यावं, असं त्यांनी सुचवलं. महिला हा समाजाचा महत्त्वाचा भाग असून त्यांची उपेक्षा करून समाजाचा विकास साधता येत नाही, असं राष्ट्रपती म्हणाल्या. 

 

विकासात जोवर महिलांची भागिदारी वाढणार नाही तोवर विकास होणार नाही हे सहा दशकांपूर्वी तात्यासाहेब कोरे यांनी जाणले होते. त्यांना पद्म पुरस्कार मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

वारणा आणि परिसरातली नवी पीढी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सन्मानाचं स्थान निर्माण करेल अशी ग्वाही विनय कोरे यांनी यावेळी दिली. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री हसन मुश्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.