August 3, 2024 10:02 AM | Droupadi Murmu

printer

राष्ट्रपति द्रौपदी मुर्मु 5 ते 10 ऑगस्ट दरम्यान फिजी, न्यूझीलंड आणि पूर्व तिमोर या 3 देशांना भेट देणार

राष्ट्रपति द्रौपदी मुर्मु 5 ते 10 ऑगस्ट दरम्यान फिजी, न्यूझीलंड आणि पूर्व तिमोर या तीन देशांना भेट देणार आहेत. फिजी आणि पूर्व तिमोर या देशांना भारतीय राष्ट्रपती पहिल्यांदाच भेट देणार असल्याचं भारताचे पूर्वेकडील देशांचे परराष्ट्र सचिव जयदीप मुझुमदार यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं. ही भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘अॅक्ट ईस्ट’ अर्थात पूर्वेकडील देशांकडं विशेष लक्ष देण्याच्या धोरणाचा भाग आहे असंही मुझुमदार म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.