राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून अंगोला आणि बोत्सवाना या 2 देशांच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज अंगोला आणि बोत्सवाना या 2 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भेटीच्या पहिल्या टप्प्यात त्या अंगोलाच्या अध्यक्षांच्या निमंत्रणावरून अंगोला देशाला भेट देतील. अंगोलाच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातही त्या सहभागी होतील. तिथल्या भारतीय समुदायाशीही त्या संवाद साधणार आहेत.

 

त्यानंतर 11 नोव्हेंबरला त्या बोत्सवानाला जातील. त्या बोत्स्वानाच्या अध्यक्षांबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच तिथल्या संसदेला संबोधित करतील.

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.