राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तामिळनाडूच्या चार दिवसीय दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तामिळनाडूच्या चार दिवसीय दौऱ्यावर असून या दौऱ्यासाठी त्यांचं कोइम्बतूर विमानतळावर आगमन झालं. त्या उद्या वेलिंग्टन उटी इथल्या संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी निलगिरी इथल्या आदिवासींशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी कोइम्बतूर आणि उटी परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.