डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आगमन

 

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आल्या आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज त्यांनी कोल्हापूर इथं महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शन घेतलं. राष्ट्रपती मुर्मू आज वारणानगर इथं श्री वारणा महिला सहकारी गटाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

 

उद्या त्या पुण्यात सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या २१व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करतील. तसंच महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात भाग घेतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी लातूरच्या उदगीर इथं बुद्धविहाराचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. तसंच शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची भेटही राष्ट्रपती घेणार आहेत.