राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून राजस्थानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात त्या उदयपूर येथील मोहनलाल सुखाडिया विद्यापीठाच्या 32 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. उद्या, राष्ट्रपती माउंट अबू येथे प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे आयोजित जागतिक शिखर परिषदेला उपस्थित राहतील. राजस्थान सरकारने आयोजित केलेल्या आदि गौरव सन्मान सोहळ्यालाही त्या उपस्थित राहणार आहेत.