राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आज एक दिवसाच्या तेलंगणा दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आज एक दिवसाच्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्या हैद्राबाद इथल्या नालसार विद्यापीठाच्या २१ व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते आज सिंकदराबाद इथल्या राष्ट्रपती निलायम मधील भारतीय कलामहोत्सवाचं उद्घाटन करण्यात येईल. आठ दिवस चालणाऱ्या या कलामहोत्सवात ईशान्येकडच्या राज्यातल्या कला, हस्तकला आणि पाककला सादर केल्या जाणार आहेत. या महोत्सवात अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरातले कलाकार सहभागी होणार आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.