डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग परिसंस्था मजबूत असणं आवश्यक असल्याचं, राष्ट्रपतींचं प्रतिपादन

देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी मजबूत MSME अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग परिसंस्था आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय MSME दिनाच्या कार्यक्रमाला त्या संबोधित करत होत्या. MSME क्षेत्र देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्या म्हणाल्या. MSME क्षेत्र ग्रामीण आणि मागासलेल्या भागात रोजगाराच्या संधी निर्माण करत असल्याचं त्यांनी म्हटलं. MSME क्षेत्र हे शेतीनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचं रोजगार निर्माण करणारं क्षेत्र असल्याचं राष्ट्रपती मुर्मू यांनी अधोरेखित केलं. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. जगभरात MSME क्षेत्राची महत्त्वाची भूमिका ओळखून संयुक्त राष्ट्रांनी २०१७ मध्ये २७ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय MSME दिन म्हणून घोषित केला. यंदाचा MSME दिवसाचा विषय, शाश्वत विकास आणि नवोन्मेषाचे चालक म्हणून MSME ची भूमिका वाढवणं हा आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.