राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोर्तुगालचा यशस्वी राजकीय दौरा आटोपून आज सकाळी स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथं पोहोचल्या. भारताच्या राष्ट्रपतींची स्लोव्हाकियाला २९ वर्षांनंतरची भेट आहे. या दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू स्लोवाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करतील. स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांचीही त्या भेट घेणार असून स्लोवाकियाच्या संसदेचे अध्यक्ष रिचर्ड रासी यांच्याशीही चर्चा करणार आहेत.