डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंगोलाच्या संसदेला संबोधित करणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज अंगोलाची राजधानी लुनाडामध्ये अंगोलाच्या संसदेला संबोधित करणार आहेत. अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ लोरन्को यांच्याशी काल त्यांची विविध मुद्द्यांवर विस्तृतपणे चर्चा झाली. दोन्ही देशांच्या राष्ट्रपतींनीं द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली. ऊर्जा, पायाभूत सुविधा, संरक्षण, आरोग्य, शेती आणि डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये भागीदारी वाढवण्यावर त्यांनी भर दिला. यादरम्यान मत्स्यपालन, जलकृषी, सागरी संसाधन आणि इतर विषयांवर सहकार्य वाढवण्यासाठी समझोता करार करण्यात आले.

अंगोलाला भेट देणाऱ्या मुर्मू पहिल्याच भारतीय  राष्ट्रपती असून त्या उद्या अंगोलाच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. अंगोलातील प्रवासी भारतीय समुदायाशीही त्या संवाद साधतील. आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती बोत्सवाना देशाला भेट देणार आहेत.