डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

वैद्यकीय आणि अभियांत्रिकी संस्थांमधील सहकार्य अत्यंत महत्त्वाचे – राष्ट्रपती

वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वाढता वापर यामुळे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी संस्थांमधील सहकार्य अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीत आज संध्याकाळी वर्धमान महावीर वैद्यकीय महाविद्यालय आणि सफदरजंग रुग्णालयाच्या सहाव्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना त्या बोलत होत्या. कृत्रिम बुद्धिमत्ता, एमआरएनए तंत्रज्ञान, रोबोटिक्स आणि थ्रीडी बायोप्रिंटिंगमधील प्रयोग वैद्यकीय क्षेत्रात मोठे बदल घडवून आणणार आहेत. संशोधन आणि  नवोपक्रमासाठी वर्धमान महावीर वैद्यकीय महाविद्यालय आणि सफदरजंग रुग्णालय, दिल्लीतल्या  अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थांबरोबर मिळून काम करू शकतात, हे आंतरविद्याशाखीय ज्ञानाचं  आदानप्रदान सर्वांच्या हिताचं  असेल, असं प्रतिपादन  राष्ट्रपती  मुर्मू यांनी  यावेळी केलं.