बदलत्या तंत्रज्ञानातली आव्हानं ओळखून जागतिक दर्जाचे सनदी अधिकारी घडवण्यावर लोक सेवा आयोगांनी लक्ष केंद्रित करावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. हैद्राबादमध्ये आयोजित देशातल्या लोकसेवा आयोगांच्या अध्यक्षांच्या राष्ट्रीय परिषदेचं उदघाटन करताना त्या आज बोलत होत्या.
याआधी बोलताना तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी सनदी अधिकाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि भरती वेळापत्रक काटेकोरपणे राबविण्यावर भर दिला होता. संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष अजय कुमार आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.