राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यपासून तीन राज्यांच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून ७ दिवस कर्नाटक, तमिळनाडू आणि तेलंगण या ३ राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कर्नाटकात मळवल्ली इथं आदि जगद्गुरु श्री शिवरथीश्वर शिवयोगी स्वामीजी यांच्या एकहजार ६६व्या जयंती उत्सवाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. येत्या १७ डिसेंबरला त्या तमिळनाडूत वेल्लोर इथं सुवर्णमंदिरात पूजा अर्चना करतील. सिकंदराबादच्या राष्ट्रपती निलायम मधे विश्राम केल्यानंतर त्या हैद्राबादमधे तेलंगण लोकसेवा आयोगाच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करतील.