मणिपूरमधल्या वांशिक हिंसाचारामुळे मणिपुरी जनतेला होणाऱ्या वेदनांची जाणीव मला असून राज्याची एकात्मता अबाधित राखून भयमुक्त वातावरण तयार करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती सध्या मणिपूरच्या दौऱ्यावर असून आज त्या इंफाळ इथे एका कार्यक्रमात बोलत होत्या. हिंसाचाराचा बळी ठरलेल्या प्रत्येक कुटुंबाच्यामागे सरकार ठामपणे उभं आहे, असं त्या म्हणाल्या. मणिपुरच्या खोऱ्यातल्या तसेच डोंगराळ भागातल्या सर्व समुदायांनी एकत्र येऊन राज्याच्या समृद्धीसाठी काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
Site Admin | December 11, 2025 8:16 PM | President Draupadi Murmu
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मणिपूर दौऱ्यावर