राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दुपारी केरळ मधील तिरुवनन्तपुरम इथं नौदलाच्या ऑपरेशनल डेमो मध्ये प्रमुख पाहुण्यां म्हणून सहभागी होणार आहेत. तिरुवनंतपुरमजवळील षण्मुघम समुद्रकिनाऱ्यावर हा कार्यक्रम होणार असून एमएच 60 आर हेलिकॉप्टरमधून राष्ट्रपतींना हवाई सलामी देण्यात येईल. या ऑपरेशनल डेमोमधुन 19 आघाडीच्या युद्धनौका आणि 32 विमानं आपल्या नौदलाची ताकद आणि युद्धाची तयारी दर्शवण्यात येईल. त्यानंतर राष्ट्रपती लोकभवनला भेट देणार आहेत.
Site Admin | December 3, 2025 9:28 AM | President Draupadi Murmu
तिरुवनन्तपुरम इथं नौदलाच्या ऑपरेशनल डेमोमध्ये राष्ट्रपती सहभागी होणार