राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून केरळच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहे. राष्ट्रपती आज तिरुअनंतपुरम इथं पोहोचतील. त्या उद्या सबरीमला मंदिरात दर्शन घेणार आहेत. तिरुअनंतपुरम इथल्या राजभवन इथं गुरुवारी माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन पुतळ्याचं अनावरण त्या करतील. श्री नारायण गुरु समाधीच्या शताब्दी समारंभात देखील राष्ट्रपती सहभागी होणार आहेत. या व्यतिरिक्त पाला इथल्या सेंट थॉमस महाविद्यालय आणि एर्नाकुलम इथल्या सेंट टेरेसा महाविद्यालयामधील कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपती सहभागी होतील. पोलिस हुतात्मा दिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत हुतात्मा पोलिसांना श्रद्धांजली अर्पण केली. सीएपीएफ म्हणजेच केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि दिल्ली पोलिसांनी यावेळी संयुक्त संचलन केलं.
Site Admin | October 21, 2025 9:26 AM | President Draupadi Murmu
राष्ट्रपती मुर्मू आजपासून ४ दिवसांच्या केरळ दौऱ्यावर