राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन करतील. साहित्य अकादमीच्या सहकार्याने राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रामध्ये  या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासह देशभरातून प्रसिद्ध साहित्यिक उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. 

 

 या संमेलनामध्ये भारतातील स्त्रीवादी साहित्य, साहित्यातील बदल विरुद्ध बदललेलं साहित्य आणि जागतिक दृष्टिकोनातून भारतीय साहित्याच्या नवीन दिशा, कवी संमेलनासह विविध सत्रं सादर होतील. तसंच या परिषदेचा समारोप देवी अहिल्याबाई होळकर यांच्या गाथेने होणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.