ज्येष्ठ नागरिक हे कुटुंबातले महत्वाचे घटक तसंच कुटुंबियांचे भावनिक आधारस्तंभ असतात, ज्येष्ठ नागरिकांनी केलेलं मार्गदर्शन समाजासाठीही महत्वाचं असतं, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित एका ज्येष्ठ नागरिक सोहळ्यादरम्यान म्हणाल्या. या सोहळ्याला उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रपतींनी राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत काही उपयुक्त साहित्य भेट म्हणून दिलं. ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा, आरोग्य तसंच राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या उपाय-योजनांबाबत राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार, तसंच राज्यमंत्री रामदास आठवले आणि बी. एल. वर्मा कार्यक्रमाला उपस्थित होते.