पोप फ्रान्सिस यांच्यावर उद्या व्हॅटिकन सिटीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या देशभरात दुखवटा पाळण्यात येणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यासाठी आज व्हॅटिकन सिटीमध्ये पोहोचल्या आहेत. त्यांच्यासोबत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन आणि गोवा विधानसभेचे उपसभापती जोशुआ डीसूझा आहेत. राष्ट्रपती मुर्मू उद्या सेंट पीटरच्या बॅसिलिका येथे पुष्पहार अर्पण करून पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहून अंत्यसंस्कारात सहभागी होतील, असं परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.