राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या गुढीपाडव्यानिमित्त देशवासियांना शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. चैत्र शुक्लदी, उगादी, चेतीचांद, नवरेह, चेराओबा या सणांनिमित्त देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय नववर्षाची सुरुवात असलेले हे सण भारताची सांस्कृतिक विविधता दर्शवतात आणि सामाजिक एकता वाढवतात असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर येत असलेला हा पहिला गुढी पाडवा सर्वांनी उत्साहाने साजरा करावा असं त्यांनी म्हटलं.