डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राष्ट्रीय कृषिसंस्थेच्या योजना शेतकरी आणि उद्योजकांसाठी सहाय्यभूत ठरतील – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

राष्ट्रीय कृषिसंस्थेने सुरू केलेल्या योजना शेतकरी आणि उद्योजकांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांच्या सर्वसमावेशक विकासासाठी साहाय्यभूत ठरतील, असा विश्वास आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला. त्यांनी रांची मधल्या नामकुम इथल्या भारतीय कृषि संशोधन परिषदेअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय कृषि संस्थेच्या शताब्दी सोहळ्याचं उद्घाटन केलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी राज्यपाल संतोष कुमार गंगवार, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी कृषि संशोधन आणि नवोन्मेष याबाबत संस्थेच्या आजी-माजी वैज्ञानिकांशी संवाद साधला.