डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आज अल्जेरियाच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठक

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज अल्जेरियाच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. अल्जेरिया-भारत आर्थिक मंचाला संबोधित करणार आहेत. अल्जेरिया, मॉरिटानिया आणि मलावी या तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल त्या अल्जेरियाची राजधानी अल्जीयर्स इथं पोहचल्या. अल्जेरियाचे अध्यक्ष अब्देल मादजीद तेब्बौने यांनी त्यांचं स्वागत केलं.

 

राष्ट्रपतींनी काल अल्जेरियातल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधला. राष्ट्रपती आज आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अल्जेरियातल्या माकम इचाहिद या शहिद स्मारकाला त्या भेट देणार आहेत. फ्रेंच वसाहतवादाविरुद्ध अल्जेरियाच्या संघर्षाच्या आठवणी जतन करणाऱ्या मौदजाहिदच्या राष्ट्रीय संग्रहालयालाही राष्ट्रपती भेट देतील.