डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 9, 2025 6:56 PM | Angola | President

printer

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची अंगोलाच्या अध्यक्षांबरोबर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज अंगोलाचे अध्यक्ष जोआओ लॉरेन्सो यांच्याशी भारत आणि अंगोला यांच्यातल्या द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी दोन्ही देशांच्या सामाईक हिताच्या विविध क्षेत्रांमधलं सहकार्य वाढवण्यावर भर दिला. उत्तम संसदीय कार्यपद्धती, कृषी, विशेषतः बियाणं आणि खतं, तेलसाठ्यांचा शोध आणि शुद्धीकरण, दळणवळणाच्या पायाभूत सुविधा, दुर्मिळ खनिजं आणि हिऱ्यावर प्रक्रिया या क्षेत्रांकडे त्यांनी लक्ष वेधलं. या क्षेत्रांमध्ये अंगोलाबरोबर काम करायची भारताची तयारी असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं. यावेळी दोन सामंजस्य करारांवरही स्वाक्षऱ्या झाल्या.