डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

योजनांमुळे महिलांना आरोग्य सेवेचा लाभ मिळण्यात लक्षणीय वाढ – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

देशात आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यासाठी केंद्रसरकार सातत्यानं प्रयत्न करत असून, आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीमुळे महिलांना आरोग्य सेवेचा लाभ मिळण्यात लक्षणीय वाढ झाली आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्लीत  अटलबिहार वाजपेयी आयुर्विज्ञान संस्था आणि डॉ राममनोहर लोहिया रुग्णालयाच्या दहाव्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. भक्कम आरोग्य सेवा सुविधा उभारण्यासाठी केंद्रसरकारनं गेल्या १० वर्षात केलेली कामं त्यांनी अधोरेखित केली. वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, एमबीबीएस आणि पदव्युत्तर पदवीच्या जागाही दुप्पट झाल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.