डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सगळ्या डॉक्टरनी आपल्या व्यावसायिक आयुष्यातली काही वर्ष  ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी व्यतित करावीत-राष्ट्रपती

सगळ्या डॉक्टरनी आपल्या व्यावसायिक आयुष्यातली काही वर्ष  ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी व्यतित करावीत असं आवाहन आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. छत्तिसगड इथं नवा रायपूर इथं आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि आयुषच्या पदवीदान समारंभात त्या बोलत होत्या.  छत्तिसगडसारख्या राज्यात न संपणारा औषधी वनस्पतींचा साठा आहे, त्याची माहिती मिळवण्याबरोबरच संशोधनाला चालना देण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या.

 

तत्पूर्वी राष्ट्रपती भिलईच्या आयआयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या पदवीदान समारंभात सहभागी झाल्या होत्या.