शैक्षणिक देवाणघेवाण हा भारत आणि न्यूझीलंड देशांतल्या संबंधातला प्रमुख आयाम-राष्ट्रपती

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लोकशाही, कायद्याचे राज्य आणि लोकांचे परस्परांशी असलेलं मजबूत नातं यामधे खोलवर रुजलेल्या सामायिक मूल्यांवर आधारित दृढ आणि मित्रत्वाचे संबंध असल्याचं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केलं. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन आणि त्यांच्या शिष्टमंडळाचं राष्ट्रपती भवनात स्वागत केल्यानंतर त्या बोलत होत्या. शैक्षणिक देवाणघेवाण हा या दोन देशांतल्या संबंधातला प्रमुख आयाम आहे असंही त्या म्हणाल्या. न्यूझीलंडच्या प्रगतीमधे मेहनती आणि कुशल भारतीय समूदायाचा लक्षणीय सहभाग असल्याचं त्या म्हणाल्या. त्या गेल्या वर्षी ऑगस्टमधे न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेल्या होत्या, त्यावेळच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.