डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

कृषी आणि पर्यावरणतज्ञांशी सल्लामसलत करून संशोधन करण्याचं राष्ट्रपतींचं डॉक्टरांना आवाहन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉक्टरांना निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याविषयी जागरूकता वाढविण्यासाठी कृषी आणि पर्यावरण तज्ञांशी सल्लामसलत करून संशोधन करण्याचं आवाहन केलं. त्या पंजाबमधे बठिंडा इथं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला त्या संबोधित करत होत्या. अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक हानीबाबत लोकांना जागरूक केलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आध्यात्मिक आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्यानं निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती मोहीम राबवण्याचा सल्ला त्यांनी दिला.