स्लोवाकिया आणि भारतादरम्यान विकास आणि विविध क्षेत्रातील सहकार्याची मोठी संधी असल्याचं राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी काल ब्रातिस्लावा इथं सांगितलं. स्लोवाक-भारत व्यावसायिक परिषदेचं उद्घाटन करताना त्या बोलत होत्या.
व्यावसायिक संधींना खऱ्या सहकार्यात रूपांतरित करण्यासाठी हा मंच एक महत्त्वाची संधी असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. भारत सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून नजीकच्या भविष्यात जागतिक स्तरावर तिसरी सर्वात मोठी आणि 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.
भारत आणि स्लोवाकियाचे संबंध मजबूत असून स्लोवाकियाच्या अभियांत्रिकी कौशल्याला भारताच्या माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुध्दीमत्ता क्षेत्राला प्रगतीशी जोडल्यास मोठं यश मिळू शकतं, आणि या मंचाने विविध उपक्रमांना कायमस्वरूपी कार्यरत राहण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे असं स्लोवाकचे अध्यक्ष पेलेग्रिनी यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.