नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलन सोहळ्याची तयारी सुरु

नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलन सोहळ्याची तयारी सुरु आहे. कर्तव्यपथावर संरक्षण दलाच्या सैनिकांकडून संचलनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिन संचलन आणि बीटिंग रिट्रीटसाठी तिकिटांची विक्री आजपासून सुरू झाली. आमंत्रण डॉट एम ओ डी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावरुन किंवा आमंत्रण ॲप वरुन थेट तिकिटं खरेदी करता येतील.