डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पपूर्व विचारविनिमय

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पपूर्व विचारविनिमय  नुकताच पूर्ण झाला. या बैठकांच्या सत्रात  संबंधित १० गटांमधले १२० हून अधिक निमंत्रित, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि कृषी अर्थशास्त्रज्ञ सहभागी झाले होते. तसंच कामगार संघटना, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र, रोजगार आणि कौशल्य, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग; व्यापार आणि सेवा, उद्योग, अर्थतज्ञ, वित्तीय क्षेत्र आणि भांडवली बाजारासह पायाभूत सुविधा क्षेत्र, ऊर्जा आणि शहरी क्षेत्रांच्या प्रतिनिधींनी या बैठकांमध्ये आपले विचार आणि अपेक्षा मांडल्या.