डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये प्रवीण कुमारला उंच उडी प्रकारात सुवर्णपदक

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज भारताच्या प्रवीण कुमारनं पुरुषांच्या उंच उडी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. त्यानं २ मीटर ८ सेंटीमीटर उंच उडी मारली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल प्रवीण कुमारचं अभिनंदन केलं आहे. याबरोबरच भारताची पदकसंख्या २६वर गेली आहे. यात ६ सुवर्ण, ९ रौप्य आणि ११ कास्यपदकांचा समावेश आहे. 

पावर लिफ्टिंगमध्ये कस्तुरी राजमणी महिलांच्या ६७ किलो वजनी गटात आज मैदानात उतरेल. भावनाबेन अजबजी चौधरी महिलांच्या भालाफेकीत, तर सोमान राणा आणि होकातो होतोझे सेमा पुरुषांच्या गोळाफेकीत सहभागी होतील.