देशभरात आज प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जात आहे. ज्यामध्ये भारताच्या विकासात आणि अर्थव्यवस्थेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या अनिवासी भारतीयांचा सन्मान केला जातो. नऊ जानेवारी १९१५ मध्ये महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते, या घटनेचं स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीचा प्रसार आणि जागतिक स्तरावर देशाचा प्रभाव वाढवण्यात प्रवासी भारतीयांचं योगदान यानिमित्त अधोरेखित केलं जातं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रवासी भारतीय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय प्रवासी समुदाय भारत आणि जग यांच्यातील एक मजबूत सेतू असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं. प्रवासी भारतीयांना भारताशी अधिक जवळ आणण्यासाठी सरकारनं अनेक महत्त्वाची पावलं उचलली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
Site Admin | January 9, 2026 1:32 PM | Pravasi Bharatiya Diwas
प्रवासी भारतीय दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांकडून शुभेच्छा