आगामी विधानसभेत समाजवादी पार्टी महाराष्ट्रात ३० ते ३५ जागा लढवणार असल्याची पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष प्रतापराव होगाडे यांची माहिती

समाजवादी पार्टी महाराष्ट्रात इंडिया आघाडीसोबत विधानसभा निवडणूक लढवणार असून ३० ते ३५ जागा लढवण्याचा पक्षाचा विचार आहे, अशी माहिती पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष प्रतापराव होगाडे यांनी वार्ताहर परिषदेत दिली. तसंच, धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा विधानसभा मतदार संघावर पार्टीचा दावा राहणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले. समाजवादी पार्टीच्या उत्तर प्रदेशातल्या सर्व खासदारांचा सत्कार १९ जुलै रोजी मुंबईत होईल आणि ९ ऑगस्ट रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांची मालेगाव इथं सभा होणार असल्याची माहितीही होगाडे यांनी दिली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.