नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

नांदेडचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनीही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सात उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर केली. यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या लोहा मतदारसंघातून चिखलीकर यांना, मुंबईतल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून झिशान सिद्दिकी, अणुशक्तीनगर मतदारसंघातून माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक, इस्लामपूर मधून निशिकांत पाटील,

तासगाव – कवठे महांकाळमधून संजय पाटील, वडगाव शेरी मधून सुनिल टिंगरे, तर शिरुर मतदारसंघातून ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.