November 19, 2024 9:05 AM

printer

वीज तज्ञ प्रताप होगाडे यांचं निधन

वीज दर नियंत्रित रहावेत यासाठी सातत्याने लढा देणारे, या क्षेत्रातील तज्ञ प्रताप होगाडे यांचं काल इचलकरंजी इथं निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष, आणि समाजवादी पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष या पदावर ते कार्यरत होते. मात्र त्यांची बहुतांशी राजकीय कारकीर्द जनता दलामध्ये घडली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.