छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर याला आज कोल्हापूरच्या न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. २५ मार्चला त्याला अटक झाल्यानंतर न्यायालयानं त्याची रवानगी ३ दिवसांच्या पोलीस कोठडीत केली होती.
दरम्यान, आज सुनावणी संपल्यानंतर पोलीस कोरटकरला घेऊन जात असताना एका वकिलानं त्याच्यावर पादत्राणानं हल्ला करायचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला पकडलं.